गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्‍तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्‍ति लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते.
तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून `मी काय केले की ती खुष होईल', या दृष्टीने प्रयत्‍न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला `माझे' म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून `मी काय केले की ते प्रसन्न होतील', या दृष्टीने प्रयत्‍न करणे आवश्यक असते। कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्‍ति व गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्‍ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.


0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: