पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी ( केशरचना / केशरचना / अलंकारधारण )

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


टिळाधारण


पुरुषाने स्वत:ला किंवा अन्य पुरुषाला टिळा लावणे :-



अ. कुंकू : मध्यमेने आज्ञाचक्रावर उभे लावावे.

आ. गंध : अनामिकेने आज्ञाचक्रावर लावावे.

इ. शेंदूर : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.

ई. बुक्का : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.

उ. अक्षता : कुंकू / गंध यांवर पाचही बोटांचा वापर करून अक्षता लावाव्यात.

ऊ. भस्म : हाताच्या मधल्या तीन बोटांनी भस्म लावतांना वरून खालच्या भागाकडे म्हणजे सर्वप्रथम कपाळावर व त्यानंतर विशुद्ध, अनाहत व मणिपूर या चक्रांवर एकानंतर एक या क्रमाने लावावे. त्यानंतर ते क्रमाने मुख, मान, हात, छाती, नाभी व पाय या ठिकाणी लावावे. (भस्म नेहमी आडवेच लावावे; उभे लावू नये.)



केशरचना


१. पुरुषांची केशरचना : पुरुष शेंडी ठेवत असल्यास उत्तम, अन्यथा पुरुषांनी भांग व्यवस्थित पाडून घ्यावा.


२. स्त्रियांची केशरचना : स्त्रियांनी शक्यतो आंबाडा घालून त्यावर गजरा माळावा.



अलंकारधारण


१. पुरुषांचे अलंकारधारण : पुरुषांनी गळयात हार (साखळी) व उजव्या हाताच्या अनामिकेत अंगठी परिधान करावी.


२. स्त्रियांचे अलंकारधारण : स्त्रियांनी विविध अलंकार पूर्ण अंगभर परिधान करावेत.


( अलंकार सोन्याचे असावेत. सोन्याचे घालणे शक्य नसल्यास चांदीचे किंवा अन्य धातूचे असावेत. अलंकार आपापल्या ऐपतीप्रमाणे घालावेत.)






...........

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: