पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी (वस्त्रधारण)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
पुरुषांनी वापरावयाची वस्त्रे

अ. सोवळे-उपरणे : शर्ट-पँटऐवजी गडद रंगाचे (शक्यतो लाल रंगाचे) सोवळे, पितांबर किंवा धूतवस्त्र परिधान करून डाव्या खांद्यावर उपरणे घ्यावे. उपरणे खांद्यावर घेतांना घडी पुढे, दशा मागच्या बाजूला व काठाची बाजू बाहेरच्या बाजूला यायला हवी. सोवळे-उपरणे परिधान करणे शक्य नसल्यास सदरा-पायजमा परिधान करावा.

आ. टोपी : शेंडी न ठेवणार्‍या पुरुषांनी डोक्यावर प्रचलित असलेली चपटी व दोन्हीकडून टोकदार असलेली टोपी घालावी. टोपी गडद रंगाची (शक्यतो लाल रंगाची) व रेशमी असावी. (प्रचलित पद्धतीनुसार सोवळे नेसले असल्यास टोपी घालत नाहीत.)

स्त्रियांनी वापरावयाची वस्त्रेनऊवारी साडी : स्त्रियांनी नऊवारी साडी नेसून डोक्यावरून पदर घ्यावा. नऊवारी साडी नेसणे शक्य नसल्यास सहावारी साडी नेसावी.



.


0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: