गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे ! - प.पू. डॉ. आठवले

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंच्या पूजनाचा दिवस. गुरूंकडून आपल्याला जे मिळाले व जे मिळत आहे, त्याप्रती पूर्ण कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस. या दिवशी सनातन हिंदु संस्कृतीच्या निर्देशक असणार्‍या व गुरु-शिष्य परंपरा जपणार्‍या सर्व विद्याशाखांमधील साधक आपापल्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात व गुरूंचे पूजन करतात.


प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले


गुरु-शिष्य परंपरा ही सनातन हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ती सनातन हिंदु संस्कृतीतील ज्ञानदानाच्या व विद्यादानाच्या पद्धतीचा गाभा आहे. तीमध्ये विद्या देणार्‍याचे व ती घेणार्‍याचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विद्या देणार्‍यावर केवळ तेवढीच विद्या देण्याची जबाबदारी नाही, तर अन्य जीवनमूल्ये त्या साधकाला शिकवण्याचीही जबाबदारी आहे. विद्या घेणारा पोटार्थी म्हणून ती ग्रहण करणारा विद्यार्थी नसून त्या विद्येचे संवर्धन करणारा साधक आहे. या संस्कृतीत `ज्ञान' ही संज्ञा ईश्‍वरप्राप्‍तीशी निगडित आहे. त्याला `सर्वश्रेष्ठ विद्या' ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी असणारे गुरुच दुसर्‍याला देऊ शकतात. जेथे अशा ज्ञानदानाची `गुरु-शिष्य' परंपरा जपणारे पूजन असेल, तेथे या सोहळयाचे वैभव काय सांगावे !
असे सर्व असतांना ज्या सनातन हिंदु धर्माने जगाला अशी अत्यंत महत्त्वपूर्ण देणगी दिली, त्याची स्थिती बिकट बनलेली आहे. अलीकडचेच उदाहरण घ्या. `दी लव्ह गुरु' नावाच्या हॉलिवूड-निर्मित चित्रपटात गुरूंचे यथेच्छ विडंबन करण्यात आले आहे. `गुरु-शिष्य' परंपरा या पुण्यभूमीतील आहे', असे आपण म्हणतो; मात्र `ती आपली नाही', हे आपल्याला सांगण्यासाठी `ही संस्कृती आर्यांची आहे व आर्य हे बाहेरून आले होते. त्यामुळे ही संस्कृती येथील नव्हे', असा खोटा इतिहास सांगितला जातो. मध्यंतरी केरळमधील देवस्वम्मंत्री सुधाकरन यांनी `गुरु अंतर्वस्त्रे घालत नाहीत. त्यांनी ते घालणे आधी शिकावे', असे संतापजनक विधान केले होते. ईश्‍वरप्राप्‍तीचे ज्ञान देणे, म्हणजे धर्माचे ज्ञान देणे. असे कार्य करणार्‍यांवर धर्मद्रोही वाटेल तसा हल्ला चढवतात, हे वेळोवेळी अनुभवाला आले आहे. सरकार सनातन हिंदु संस्कृतीचे कोणत्याही प्रकारे पोषणकर्ते तर नाहीच; उलट ते ती नष्ट करू पहात आहे, हेही वेळोवेळी प्रत्ययाला आले आहे.
मग तो रामसेतूच्या भंजनाचा `सेतूसमुद्रम प्रकल्प' असो वा हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या इस्लामचा रक्‍तरंजित इतिहास उघड होऊ न देण्याचा विविध प्रकारचा सरकारी खटाटोप असो. अशा स्थितीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन करतांना केवळ `स्वत:ला काही मिळावे', अशी अपेक्षा न ठेवता ज्या धर्माने ही गुरु-शिष्य परंपरा दिली, त्याच्या रक्षणासाठी कार्यरत होण्याची शक्‍ती व बुद्धी मिळण्यासाठी गुरुकृपा व्हावी, यासाठी प्रयत्‍न करावेत.
जगद्‌गुरु भगवान श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला उपदेश केला,

`हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।' (श्रीमद्भगवद्‌गीता २.३७)
अर्थ : `हे अर्जुना (म्हणजे साधका), ऊठ आणि दुर्जनांचा नाश करण्याचा निश्चय करून लढण्यासाठी तयार हो.'
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ हजार पट अधिक कार्यरत असते. त्यामुळे शिष्याला गुरुकृपा अधिक प्राप्‍त होते. धर्माचे रक्षण केले, तर धर्म आपले रक्षण करतो. याच न्यायाने धर्माने दिलेल्या परंपरांनी धर्माचे रक्षण होण्यासाठी काही केले, तर त्या परंपरांचेही रक्षणच नव्हे, तर संवर्धनही होते. असे वर्षभर होत रहाणे, म्हणजे गुरुकृपेच्या अखंड वर्षावाची खात्री. देहधारी गुरु भिन्न असले, तरी तत्त्व एकच असते. त्या तत्त्वाच्या चरणी `धर्मरक्षणासाठी कार्यरत होण्याची शक्‍ती व बुद्धी सर्वांना द्यावी आणि जे कार्यरत आहेत, त्यांच्यावर गुरुकृपेचा स्रोत सतत रहावा', ही श्रीगुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना !'

- डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: