सूर्यास्ताच्या वेळी आरती करण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने वायुमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते, तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा फायदा उठवून वाईट शक्‍ती वातावरणातील आपला संचार वाढवतात. अशा रज-तमात्मक वायुमंडलाचा त्रास होऊ नये, यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींतून देवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रह्मांडकक्षेत आणणे आवश्यक असते. आरतीमुळे वायुमंडलात देवतांच्या चैतन्यमय लहरींचे प्रमाण वाढून त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण कमी होते व जिवाच्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते.'


..........

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: