चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण ( केर काढणे )

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. आज आपण केर काढण्याच्या संदर्भातील आचारांविषयी माहिती पाहूया.


१. केर कधी काढावा ?
अ. `घर घाणेरडे झाले असेल, तर भावपूर्णरीत्या नामजप करत क्षात्रभाव ठेवून कुठल्याही वेळी केर काढावा. असे केले तरच केर काढण्याच्या कृतीतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांचा देहावर प्रभाव पडणार नाही.
१ आ. स्वत:ला कर्मबंधनाचा आचाररूपी नियम लागू करून सकाळीच, म्हणजेच रज-तमात्मक क्रियेला अवरोध करणार्‍या वेळेतच हे कर्म उरकून घ्यावे
१ इ. सायंकाळी केर न काढणे : सकाळी एकदाच केर काढावा. सायंकाळी केर काढू नये; कारण या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक स्पंदनांचा संचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेशी संबंध असलेल्या या प्रक्रियेतून वाईट शक्‍तींचा घरात शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. सकाळचे वायूमंडल सत्त्वप्रधान असल्याने हे वायूमंडल केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांवर यथायोग्य अंकूश ठेवते; म्हणून या क्रियेचा कुणालाच त्रास होत नाही.

२. केरसुणीने केर कसा काढावा ?

२ अ. केर काढतांना कमरेत उजव्या बाजूला झुकून उजव्या हातात केरसुणी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा.
२ अ १. कमरेत वाकण्याने होणारी प्रक्रिया : `केर काढतांना कमरेत वाकल्याने नाभीचक्रावर दाब येऊन पंचप्राण जागृत अवस्थेत रहातात. केर गुडघ्यात वाकून कधीच काढू नये; कारण या मुद्रेमुळे गुडघ्याच्या पोकळीत साठलेल्या किंवा घनीभूत झालेल्या रज-तमात्मक वायूधारणेला गती मिळण्याची शक्यता असे. त्यामुळे या मुद्रेत केर काढल्यास केर काढतांना पाताळातून वायूमंडलात उत्सर्जित होणारी त्रासदायक स्पंदने देहाकडे आकृष्ट होण्याची भीती असते; म्हणून रज-तमात्मकतेचे देहात संवर्धन करणारी अशी कृती शक्यतो टाळावी.
२ अ २. उजव्या बाजूला झुकल्याने होणारी प्रक्रिया : उजव्या बाजूला झुकून केर काढल्याने देहातील सूर्यनाडी जागृत रहाते व तेजाच्या स्तरावर देहाचे जमिनीतून उत्सर्जित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.'
- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

२ आ. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे.
२ आ १. केर काढत पूर्व दिशेला गेल्यास केरातील रज-तम कण व लहरी यांमुळे पूर्वेकडून येणार्‍या देवतांच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होणे : `पूर्व दिशेकडून देवतांच्या सगुण लहरींचे पृथ्वीवर आगमन होत असते. कचरा हा रज-तमात्मक असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे केर काढतांना कचरा व धूळ यांचे पूर्व दिशेने वहन होऊन त्यांद्वारे रज-तम कण व लहरी यांचे प्रक्षेपण होऊन पूर्व दिशेकडून येणार्‍या देवतांच्या सगुण तत्त्वाच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केर काढत पूर्वेकडे जाणे अयोग्य आहे. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जाऊ शकतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.५५) (क्रमश:)

संदर्भ : अध्यात्मविषयक ग्रंथ `दिनचर्येशी संबंधित आचार व त्यांमागील शास्त्र'

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: