कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मायेत खूप गुरफटलेले असतात. मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. आपल्या कुळातील अशा या अतृप्त लिंगदेहांना सद्गती प्राप्त करून देण्याचा एक मार्ग म्हणजे श्राद्धविधी. श्राद्धविधी म्हटला की, तो कोणी करावा, कोठे करावा, कधी करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. काल आपण श्राद्ध कोणी करावेत, याविषयी माहिती पाहिली. आज आपण श्राद्ध कोठे करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.
श्राद्ध कोठे करावे ?
१. श्राद्धासाठी योग्य जागा (श्राद्धदेश) अ. `दक्षिण बाजूला उतरती अशी जागा श्राद्धासाठी चांगली असते. आ. गोमयाने सारवलेली, तसेच कीटकादी प्राणी व अपवित्र वस्तू यांनी वर्जित अशी भूमी श्राद्धासाठी चांगली असते. इ. वनात, पुण्यस्थानी किंवा शक्यतो स्वत:च्याच घरात तळमजल्यावर श्राद्ध करावे. आपल्या घरात श्राद्ध केले असता तीर्थाच्या तुलनेत आठपट पुण्य प्राप्त होते. प्रसंगी दुसर्याच्या घरात त्याच्या परवानगीने किंवा थोडेसे भाडे देऊन श्राद्धासाठी जागा घ्यावी. ई. ज्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचे स्वामित्व नसते अशी ठिकाणे, म्हणजे वने, पर्वत, नद्या, तीर्थे, मोठी सरोवरे, देवालये या ठिकाणी श्राद्ध करण्यास हरकत नाही.
२. विशिष्ट क्षेत्री श्राद्ध करण्याचे महत्त्व २ अ. श्राद्ध करण्यास जास्त योग्य क्षेत्रे व त्यांचे महत्त्व : `गंगा, सरस्वती, यमुना, पयोष्णी इत्यादी नद्यांच्या ठिकाणी; महोदधी म्हणजे मोठ्या समुद्राच्या काठी; प्रभासतीर्थ, पुष्करतीर्थ, प्रयाग, काशी, गया, मातृगया, कुरुक्षेत्र, गंगाद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी; नैमिषक्षेत्र, धर्मारण्य, धेनुकारण्य इत्यादी अरण्यांच्या ठिकाणी; ब्रह्मसरोवर, महासरोवर यांच्या ठिकाणी; अक्षय्यवट, महाक्षेत्रे यांच्या ठिकाणी; तुळसी, आवळे यांच्या वनांतील छायेखाली इत्यादी क्षेत्रांत श्राद्धे केली असता अक्षय्य पद प्राप्त होते.
२ आ. श्राद्धाच्या संदर्भात गया क्षेत्राचे महत्त्व १. गया क्षेत्रातील प्रेतशिलेवर पिंडदान केल्यामुळे प्रेतत्व नष्ट होऊन आत्मा पितरलोकात जातो. २. गया क्षेत्राच्या ठिकाणी शमीपत्राप्रमाणे पिंड दिल्याने सात गोत्रांचा, म्हणजे एकशे एक कुळांचा उद्धार होतो. वर दिलेल्या सर्व ठिकाणी श्राद्धाप्रमाणेच स्नान, दान, तप इत्यादी कर्मे केली असता त्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळते.' ३. श्राद्धास वर्ज्य जागा : `गुरांचा गोठा, हत्ती बांधण्याची जागा, घोड्याची पागा, दगडांनी बांधलेले कट्टे व पाणी या ठिकाणी श्राद्ध करू नये. केल्यास पितर त्या श्राद्धकर्माचा विघात करतात.' (क्रमश:) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२० )
सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या आम्हाला अवश्य पाठवाव्यात.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पितृपंधरवडा म्हणजे आपल्या कुळातील ज्या पितरांना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देण्याची संधी. विधी म्हटले की, तो विधी कोणी करावा, कधी करावा, कोठे करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे या सदरातून आपल्याला मिळतील. आज आपण श्राद्ध कोणी करावे, या संदर्भातील माहिती पाहूया. १. स्वत: करणे महत्त्वाचे : `श्राद्धविधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो. आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे, तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे. (वरील मुद्दा तत्त्वत: योग्य असला, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठिण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पहाता स्वत: श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे प्रत्येकाच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी व ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास हरकत नाही. श्राद्धविधी होणे हे जास्त आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे. - संकलक)
२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे : पूर्वजांची स्पंदने व त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने, यांमध्ये खूप साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने व पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.
३. श्राद्धविधी अमूक एक व्यक्ती करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म ! :मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
एकत्र कुटुंबात कर्त्या वडीलपुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.' प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल व त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने तयार केली आहे. `एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते', असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. (इतके मार्ग असूनही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? - संकलक)
४. स्त्रियांनी श्राद्ध करणे अ. मुद्दा `३' मध्ये मुलगी, पत्नी, आई व सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सांप्रत काळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाहीत. याचे कारण असे की, पूर्वी स्त्रियांचे मौजीबंधन होत असे. हल्ली मात्र स्त्रियांच्या बाबतीत हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे, हेही बंद झाले; मात्र आपत्काळात, म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपलब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे.
सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या त्वरित नजीकच्या सत्संगात पाठवाव्यात.
१५.९.२००८ ते २९.९.२००८ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने आपण पितर व श्राद्ध यांविषयीची माहिती जाणून घेऊया.
चातुर्मासात आपण बरेच सण व उत्सव साजरे करतो. त्यांपैकी बर्याच `सणांची शास्त्रीय माहिती, ते साजरे करण्याचे महत्त्व' या धर्मसत्संगांच्या मालिकेत यापूर्वीच्या भागांत आपण पाहिले. आज आपण पहाणार आहोत याच चातुर्मासाच्या कालावधीत केल्या जाणार्या एका महत्त्वाच्या विधीबद्दल. हा विधी म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या तृप्तीकरीता केला जाणारा श्राद्धविधी. हल्लीच्या काळात सण व उत्सव उत्साहात साजरे केले जातात; मात्र आपल्याच पूर्वजांच्या शांतीसाठी कर्तव्य म्हणून श्राद्ध करणे आवश्यक असतांनादेखील हा विधी करतांना समाजात कोणी फारसे आढळत नाहीत. बर्याच जणांना `हा विधी करणे म्हणजे वेळ व पैसा यांचा अपव्यय करणे', असेच वाटते. अगदी आस्तिक असणारी माणसेही `आमचा देवावर विश्वास आहे; पण आता जग एवढे पुढे गेले असतांना, श्राद्ध वगैरे करणे आम्हाला काही पटत नाही', असे म्हणतांना आढळतात. याचे कारण म्हणजे या विषयाचा त्यांचा काहीच अभ्यास नसणे व श्राद्धाबद्दल असलेले गैरसमज. आपल्याला कौटुंबिक जीवनात होणारे बरेच त्रास हा विधी न केल्याने होत असतात. हे त्रास कोणते, ते त्रास श्राद्ध केल्याने कसे दूर होतात, म्हणजेच श्राद्धविधी करण्याचे महत्त्व काय व हा विधी केल्याने आलेल्या अनुभूती आपण आजच्या भागात पहाणार आहोत.
२ अ १. ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले `मृत्यू व त्यानंतरची गती' यांविषयीचे शास्त्र मृत्यूनंतर एखाद्याचे अस्तित्व असू शकते, हेच मुळात आजच्या काळात विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानणार्या अनेकांना पटत नाही. `जे स्थूल डोळयांना दिसते, तेवढेच जग', असे म्हणणार्या विज्ञानवाद्यांना श्राद्ध वगैरे करणे पटत नाही. हे लोक सर्वतोपरी विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवतात. माणूस मेला की पुढे त्याचे काय होते ? मरण हे जीवनाचे शेवटचे टोक आहे का कि मृत्यूनंतरही जीवन असते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञान आजपर्यंत तरी देऊ शकलेले नाही. मात्र आता विज्ञानही या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. बुद्धीच्या पलीकडचे हे शास्त्र ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले असतांना, वैज्ञानिक आता त्याला बुद्धीच्या आधारे सिद्ध करू पहात आहेत ! लंडनमध्ये नुकतीच एक जागतिक परिषद झाली. त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या; पण नंतर पुन्हा जिवंत झालेल्या बर्याच लोकांच्या विचित्र अनुभवांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे पुन्हा जिवंत झालेल्या तब्बल १० टक्के लोकांनी बेशुद्धावस्थेत किंवा मृतावस्थेत आपल्याला आलेले अनुभव कथन केलेले आहेत. या घटनांचा विचार केल्यानंतर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, विचारांचा जन्म मेंदूतून होत असेल, तर या मृत झालेल्या लोकांमध्ये कोणत्याही विचारांचा जन्म व्हावयास नको होता; पण तसे झालेले नाही. उलट त्यांनी त्या काळात घडलेल्या सर्व घटनांचे इत्यंभूत वर्णन केले आहे. त्यामुळे माणूस मृत झाला, तरी त्याचे विचार चालू ठेवणारी एखादी शक्ती त्याच्या शरिरात असावी. विज्ञानाला आता लागलेल्या या शोधाविषयीचे ऋषीमुनींनी सांगितलेले शास्त्र असे आहे - `स्थूलदेहाला सोडून लिंगदेह शरिराबाहेर पडला, तरी मनोदेह व कारणदेह कार्यरत रहात असल्यामुळे ती व्यक्ती मन व बुद्धी यांच्या आधारे विचार करू शकते.' माणूस मृत झाल्यावर त्याचा पुढचा प्रवास कसा होतो, त्या प्रवासावर त्याच्या मनावरील संस्कारांचा काय परिणाम होतो, तसेच मृत्यूच्या वेळी मनात एखादी वासना अतृप्त राहिल्यामुळे पुढील प्रवासास होणारा अडथळा व त्यावर उपाय म्हणून श्राद्ध करण्याची आवश्यकता का आहे, या सर्वांविषयीचे शास्त्र कैक हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी अत्यंत सविस्तररीत्या लिहून ठेवले आहे. त्याचे महत्त्व आता तरी विज्ञानवाद्यांनी समजून घेतले, तर त्यांना बुद्धीने न सोडवता आलेल्या कितीतरी समस्या ते सहज सोडवू शकतील.
२ अ २. श्राद्धविधी करणे, म्हणजे कर्तव्यपालन ! भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे की, धर्मपालन व कर्तव्य म्हणून निकटवर्तियांची जिवंतपणी सेवासुश्रुषा करणे व त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना चांगली गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करणे. याउलट पाश्चिमात्य देशांत आई-वडील म्हातारे झाले की, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात व नंतर त्यांची साधी चौकशीही करीत नाहीत !
२ अ ३. श्राद्धपक्ष यासाठीच चातुर्मासातील भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात, म्हणजेच श्राद्धपक्षात पितरांचे श्राद्ध करावे. या पक्षाला `पितृपक्ष', असेदेखील म्हटले जाते. या काळात पितर श्राद्धात अर्पण केलेले अन्न ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात. या पक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात. भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करावे.
२ अ ४. श्राद्धपक्ष दरवर्षी करणे महत्त्वाचे प्रत्येक वर्षी श्राद्ध करून त्या त्या लिंगदेहांभोवती असलेले वासनात्मक कोषांचे आवरण कमी करून त्यांना हलकेपणा प्राप्त करून देऊन मंत्रशक्तीच्या ऊर्जेवर त्यांना गती देणे, हे पितृऋण फेडण्याचे प्रमुख साधन आहे. सर्वच लिंगदेह साधना करणारे नसल्याने त्यांना बाह्य ऊर्जेच्या बळावर श्राद्धादी कर्मे करून पुढे ढकलावे लागते; म्हणून प्रत्येक वर्षी श्राद्धकर्म करणे महत्त्वाचे ठरते.
२ अ ५. पितरांची कृपा आवश्यक आपल्याला जीवनात देवांच्या कृपेइतकीच पितरांची कृपाही आवश्यक असते. `पितर रागावलेल्या कुटुंबात शांती नसते. त्या कुटुंबातील व्यक्तींना जुनाट रोग होतात', असे शास्त्रात सांगितले आहे. २ अ ६. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आज विज्ञानाने बर्याच सुखसोयी उपलब्ध करून दिल्या असूनसुद्धा पूर्वीपेक्षा हल्लीच्या काळात कौटुंबिक समस्या व दु:ख यांचे प्रमाण वाढलेले दिसते. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, घरातील कर्ती व्यक्ती व्यसनाधीन होणे यांसारख्या अनेक समस्या आढळून येतात. या समस्यांचे निराकरण करणे प्रगत विज्ञानालाही शक्य नाही; कारण या समस्यांच्या मूळ कारणांचा शोध विज्ञानाला घेता येत नाही. पूर्वीच्या काळी सर्व घरांत श्राद्धविधी कर्तव्य म्हणून नित्यनेमाने केले जात असल्याने पूर्वज संतुष्ट रहायचे. त्यामुळे कौटुंबिक कलह वा समस्या यांचे प्रमाण त्यामानाने कमी होते. आजच्या काळात वाढलेल्या या समस्यांचे एक कारण `पूर्वज संतुष्ट नसणे', हे असते; म्हणजेच आपण श्राद्धविधी न केल्याने त्यांना पुढची गती मिळत नाही व त्याचीच जाणीव करून देण्यासाठी ते आपल्याला त्रास देतात. आपला धर्माचा अभ्यास नसल्याने, तसेच श्राद्धविधीमागील शास्त्र व त्याचे महत्त्व माहिती नसल्याने त्रास असण्यामागील हे कारण आपल्याला कळत नाही. आपण या समस्यांचे निराकरण आपल्या बुद्धीला पटेल त्या मार्गाने करायला जातो; पण शेवटी पदरी अपयशच येते. अशाच अपयशी ठरलेल्या अनेकांनी उपाय म्हणून श्राद्धादी विधी केल्याने त्यांचे त्रास दूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
२ अ ७. उद्देश पितरांची पूजा करणे, हा धर्माचाच एक भाग मानला गेला आहे. पितरांना सद्गती लाभावी, त्यांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, जे पितर पितृलोकात न जाता भूतयोनीत गेले असतील आणि जे वंशातल्या किंवा कुळातल्या लोकांना बाधा करीत असतील, त्यांची ती बाधा दूर व्हावी, त्याबरोबरच त्यांचा उद्धार व्हावा, असे बहुविध उद्देश पितृपूजा केल्याने सफल होतात.
२ अ ८. फलप्राप्ती स्मृतिचंद्रिका व इतरही अनेक ग्रंथांत `आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात', असे सांगितले आहे.
२ अ ९. कोणी करावे ? २ अ ९ अ. क्रम : मुलगा, मुलगी, नातू, पणतू, पत्नी, मालमत्ता घेणारा मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड, समानोदक, शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
२ अ ९ आ. स्वत: करणे महत्त्वाचे : खरे म्हणजे हा विधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो.
२ अ ९ इ. विभक्त कुटुंब असल्यास : एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.
२ अ १०. श्राद्ध मन लावून करणे मनात विविध विचार सुरू असतील, तर विधी परिणामकारक होत नाही. त्यामुळे पितरांना श्राद्धाचा लाभ कमी प्रमाणात होतो. माणसाचे मनोव्यापार सुरू असले की, त्याचा वासनादेह व मनोदेह यांतून बाहेर पडणार्या स्पंदनांचा मृत माणसाच्या मनावर पुष्कळ परिणाम होतो; म्हणून श्राद्ध करतांना ते मन लावून व नीटनेटके केले पाहिजे.
२ अ ११. अन्न किती काळ पुरते ?पितृपक्षात अर्पण केलेले अन्न पितरांना दुसर्या पितृपक्षापर्यंत, म्हणजे वर्षभर पुरते.
२ अ १२. श्राद्धविधी अमुक एक कारणाने करू शकत नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !श्राद्ध करण्यात येणार्या अडचणी दूर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. या सर्व पद्धतींवरून एकच लक्षात येते की, दरवर्षी येणार्या श्राद्धाच्या दिवशी किंवा श्राद्धपक्षात पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केलेच पाहिजे, त्याशिवाय राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश आहे. तरीही इतके मार्ग असूनही आजकाल हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. अशांना कोण मदत करू शकणार ? सर्वांत प्राचीन धर्म असून व सर्वांत आधी इतका सखोल अभ्यास करून फक्त हिंदु धर्मानेच या विधींचे शास्त्र सांगितलेले असूनही आज बहुसंख्य हिंदू हे विधी करत नाहीत. याचे कारण आपला धर्माचा अभ्यास नसणे व आपली आपल्याच धर्मावर श्रद्धा नसणे. दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांचे होणारे त्रास कसे कमी होतात, यांसंदर्भातील माहिती आपण पुढील धर्मसत्संगात पाहूया. आपल्यापैकी अनेकांच्या घरांत भांडणे होणे, भयानक स्वप्न पडणे, निद्रानाशाचा त्रास असणे, साप दिसणे, सतत आजारपण असणे, व्यवसायात यश न येणे यांसारखे कमी-अधिक प्रमाणात पूर्वजांचे त्रास होत असतात. त्यांवर आपण बुद्धीने विचार करून आतापर्यंत बरेच उपाय केलेही असतील; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्यास ते त्रास पूर्वजांमुळेच आहेत, हे नक्की होते. त्यावर जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन उपाय म्हणून श्राद्धादी विधी करून घेतल्याने तुम्ही या त्रासांतून कायमची मुक्तता मिळवू शकाल. आतापर्यंत बर्याच जणांनी याचा अनुभव स्वत: घेतलेला आहे
संदर्भ : सनातन धर्मसत्संग ध्वनीचित्र-तबकडी `पितृपक्ष व महालय श्राद्ध' - ध्वनीचित्र-तबकडी हवी असल्याससंपर्क : रत्नागीरी (०२३५२) २२२३४६
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण गणपति व इतर देवता यांचे साम्य याविषयी माहिती जाणून घेऊया.
१३. गणपति व इतर देवता १३ अ. शिव व गणपति : `सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला आणि शिवपुत्र मानतो; पण अशी ही एक कल्पना आहे की, शिव आणि श्री गणेश या देवता पूर्वी एकरूपच होत्या; जो शिव तोच श्री गणेश आणि जो श्री गणेश तोच शिव होता. श्री गणपति अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून `त्वं ब्रह्मा त्वं विष्णु: त्वं रुद्र: ।', असे म्हटले आहे. श्री गणेश व शिव यांचे साम्य व सामर्थ्य सहज कळावे इतके ठळक आहे. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषणे ही शिवाची तीन वैशिष्ट्ये श्री गणेशमूर्तीतही आढळतात. श्री गणेशाला भालचंद्र असे नाव आहे. `गजवदनमचिंत्यम्' या श्री गणेशाच्या ध्यानश्लोकात त्याला त्रिनेत्रीही म्हटले आहे. तसेच श्री गणेशाच्या कमरेभोवती नागबंधही आहे. शंकराने हालाहल प्राशन केल्यानंतर तज्जन्य दाह शांत करण्यासाठी सूर्यभूषणे घातली व मस्तकी चंद्र धारण केला, अशी कथा आहे. श्री गणेशाबद्दलही अशीच कथा गणेशपुराणात आढळते. अनलासुर अग्नीरूपाने जग जाळीत होता, तेव्हा त्याचे श्री गणेशाने भक्षण केले; मग त्याचा दाह शांत करण्यासाठी देवांनी श्री गणेशावर सर्प, चंद्र इत्यादी शीतलोपचार केले.'
१३ आ. हनुमान व श्री गणपति :या दोघांचा रंग लाल आहे. या दोघांकडे अष्टमहासिद्धी आहेत. हनुमानाला रुई वहातात, तर श्री गणपतीला पांढरी रुई, म्हणजे मंदार, याची पत्री वहातात.
१३ इ. ओंकार (ॐ) व गणपति :`सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगतांना, सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी `ॐ इतिध्वनिरभूत्' म्हणजे `ॐ' असा ध्वनी झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरूप `सवै गजाकर: ।', म्हणजे तो ध्वनी, म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमत: ध्वनी झाला व तो `ॐ' असा झाला. हा ओंकार उभा करून पहा, म्हणजे `तो गणपतीच्या मुखासारखा आहे', हे लक्षात येईल. तात्पर्य, ॐ व श्री गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत; म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले. ओंकारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा । कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।। म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत, असे म्हटले आहे. ओंकार हे श्री गणपतीचे स्वरूप आहे.' (?)
१३ ई. कुंडलिनी व गणपति : श्री गणपति अथर्वशीर्षात ऋषींनी गणेशाचे वर्णन `मूलाधारस्थितोऽसि नित्यं', म्हणजे `तू शरिरातील मूलाधारचक्राच्या ठिकाणी नित्य रहातोस', असे केले आहे. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता समजली जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत. श्री गणपतीचा रंगही लाल आहे. मूलाधार हे षट्चक्रांतील आरंभीचे चक्र असून आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ मूलाधारचक्र जागृत झाल्यावर होतो. तसेच कोणत्याही कार्यारंभी श्री गणपतीची पूजा करतात. (समाप्त)
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अश्लील चित्रपटगिते लावण्यापेक्षा देवतांचा नामजप लावा ! भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण अथर्वशीर्षासंबंधी माहिती जाणून घेऊया.
अथर्वशीर्ष थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती व शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी `साममुद्गल गणेशसूक्त' लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी `श्री गणपति अथर्वशीर्ष' लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते व स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी व ध्यान नंतर आहे. अथर्वशीर्षाचे पुढील तीन प्रमुख भाग आहेत - १. शांतीमंत्र : सुरुवातीला `ॐ भद्रं कर्णेभि:' व `स्वस्तिन: इंद्रा.....' हे मंत्र आणि शेवटी `सह नाववतु ।......' हे मंत्र २. ध्यानविधी : `ॐ नमस्ते गणपतये' येथपासून ते `वरदमूर्तये नम:' येथपर्यंतचे दहा मंत्र ३. फलश्रुती :`एतदथर्वशीर्ष योऽधीते' इत्यादी चार मंत्र अथर्वशीर्ष म्हणणे : हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे. १. उच्चार अगदी स्पष्ट असावेत. २. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे. ३. स्तोत्रपठण `तदर्थभावपूर्वक तत् अर्थ भावपूर्वक', म्हणजे `त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह' झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे. ४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा `वरदमूर्तये नम: ।' येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा. ५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय. ६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे. ७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी. ९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे. १०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे. ११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा. १२. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास श्री गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी व तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान श्री गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास सुरुवात करावी. १३. उच्चारात चुका होऊ नयेत; म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते जाणत्या व्यक्तीकडून शिकून घ्यावे. १४. स्तोत्र म्हणतांना श्री गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.
अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे १. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने व फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्रपठण करणार्याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते. २. स्तोत्रपठण करणार्याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते. (क्रमश:) (संदर्भ : अथर्वशीर्ष स्तोत्र व त्याचा सविस्तर अर्थ सांगणारा सनातनचा लघुग्रंथ `श्री गणपत्यथर्वशीर्ष व संकष्टनाशन श्री गणेशस्तोत्र (अर्थासह)' ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल (०२१४३) २३३ १२०
मिरवणुकीत श्री गणेशाचा नामजप करा ! मिरवणुकीतून जातांना मोठ्या आवाजात अश्लील चित्रपटगीते लावणे वा म्हणणे त्याबरोबर हिडीस अंगविक्षेप करत वाचणे, गुलाल उधळणे व जोरजोरात ओरडणे, अशा प्रकारची गैरवर्तणूक करण्याने वातावरण सात्त्विक न बनता तामसिक बनते. त्यामुळे त्याचा मिरवणुकीतील नागरिकांना फायदा न होता उलट समाजाची सात्त्विकता कमी होण्यास कारणीभूत ठरते.
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण ज्येष्ठ गौरी हे व्रत करण्याची पद्धत व अनंत चतुर्दशी यांविषयी शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया.
ज्येष्ठा गौरी १. तिथी : `भाद्रपद शुद्ध अष्टमी२. इतिहास व उद्देश : असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
व्रत करण्याची पद्धत अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री लक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात.
आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
इ. तिसर्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात व परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.'
अनंत चतुर्दशी
१. तिथी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी २. उद्देश : मुख्यत: हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते. ३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताची सुरुवात कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात व मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. (क्रमश:)
नागरिकांना आवाहन !आपल्या परिसरातील वा आपल्याला माहीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांकडून गैरप्रकार होत असल्यास त्याला विरोध न करणे म्हणजे याला मूकसंमती देणे होय. धर्माच्या दृष्टीकोनातून धर्मद्रोही कृत्ये करणारा व त्याला मूकसंमती देणारा, हे दोघेही सारखेच गुन्हेगार ठरतात. गैरप्रकार घडू नयेत, यासाठी आपण समाजाचे घटक आहोत, हे लक्षात ठेवून चुकीच्या गोष्टींविरुद्ध कृती करावयास हवी !
उद्याच्या खंडणीबाजांच्या विरोधात आजच कृती करा ! गणेशोत्सवातील निधीसंकलनाच्या वेळी करण्यात येणार्या जबरदस्तीच्या विरोधात कृती करणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे, तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. आज धार्मिक उत्सवाची वर्गणी जमा करतांना लोकांवर जबरदस्ती करणार्यांमधून पुढे खंडणीबाज निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्या. जबरदस्तीने वर्गणी मागणार्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा !
गणेशभक्तांनो, अंनिसच्या अशास्त्रीय `मूर्तीदान मोहिमे'ला विरोध करून शास्त्रोक्त मूर्तीविसर्जनच करा ! भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपति पूजन, गणेश विसर्जन आदींविषयी शास्त्रोक्त विधी जाणून घेऊया.
सनातनची सात्विक श्री गणेशमूर्ती
१२ उ १० अ. `मूर्तीदान' हे अशास्त्रीय, तर `मूर्तीविसर्जन' हेच योग्य : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या जलात किंवा जलाशयात करणे आवश्यक असते, असे शास्त्रात सांगितले असले तरी जलप्रदूषण, अवर्षण इत्यादींमुळे `मूर्तीविसर्जन' याकडे काही जण समस्या म्हणून पहातात. त्यावर उपाययोजना म्हणून `अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)'सारख्या धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे हास्यास्पद आवाहन करतात. मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय असून तो श्री गणेशाचा अवमान आहे. `गणपतीच्या मूर्तीचे दान' अशास्त्रीय असल्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. २. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही. ३. श्री गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्याला दान म्हणून दिली. अंनिसचे कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान म्हणून घेऊन नंतर त्या दगडांच्या खाणींमध्ये फेकून देतात, असे निदर्शनास आले आहे. आपल्या श्रद्धास्थानाची ते अशी `विल्हेवाट' लावतात. मग आपण असा धर्मद्रोह का होऊ द्यायचा ? `सनातन संस्था' यासंदर्भात दरवर्षी जनजागृती मोहीम राबवते. आपणही मूर्तीदान करू नका, तसेच धर्मरक्षणाच्या कार्यासाठी सनातनच्या मोहिमेत सहभागी व्हा !
१२ उ १० आ. आपत्कालीन परिस्थितीत `मूर्तीविसर्जन' कसे करावे ? : काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जलाशयाचा पुरेसा साठा नसतो. काही ठिकाणी सर्व जलस्रोत दूषित असल्याने मूर्ती विसर्जन करण्यासाठी योग्य नसतात, तसेच एखाद्या ठिकाणी दुष्काळ अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यासही मूर्तीचे विसर्जन करणे शक्य होत नाही. अशी स्थिती असल्यास त्यावर पुढील दोन प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो.
१. मूर्तीची प्रतिष्ठापना न करता त्याऐवजी सुपारी ठेवून सुपारीवर प्रतिकात्मक श्री गणपतिपूजन करावे. सुपारीचे विसर्जन छोट्या विहिरीत किंवा ओहोळात करता येते.
२. श्री गणेश चतुर्थीसाठी धातूची नवीन मूर्ती आणावी व तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा करावी. आपल्या दररोजच्या पूजेत श्री गणपति असला तरी नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश असा आहे - गणेश चतुर्थीच्या वेळी पृथ्वीवर गणेशलहरी खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. यासाठी धातूची नवीन मूर्ती आणावी. विसर्जनाच्या वेळी अशी मूर्ती जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नसते. विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या व मूर्ती उजव्या हाताने जागेवरून थोडी हालवावी. त्यानंतर मूर्ती घरात एखाद्या पवित्र जागी ठेवावी. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीतील तत्त्वही विसर्जित होते. त्यामुळे अशा मूर्तीची दररोज पूजा करण्याची आवश्यकता नाही. पुढील वर्षी या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करावी.
२ उ ११. मूर्तीभंग :`प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी व दुसर्या, तिसर्या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश `अद्भुत दर्शन शांती' करावी. दीपपतन, दृषद्स्फुटन (पाटा फुटणे), आळवाला फूल येणे, मूर्ती भंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी, गंभीर आजार वा अपमृत्यू घडण्याची शक्यता असते; म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.' (क्रमश:)
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ पाहूया.
सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती
गणपतीला तुळस न वहाण्याचे कारण पौराणिक कारण : `एक अप्सरा अती सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, `हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !' ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, `हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?' ती म्हणाली, `मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.' गणपति म्हणाला, `मी कधीच विवाह करून मोहपाशात पडणार नाही.' त्यावर अप्सरा म्हणाली, `तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.' गणपतीने तिला प्रतिशाप दिला, `तू पृथ्वीवर वृक्ष होशील.' अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, `मला क्षमा कर.' गणपति म्हणाला, `माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.' ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वहात नाहीत.'
अन्य कारण : श्री गणपति ही जास्तकरून सकाम भक्तीची देवता आहे, तर तुळस ही वैराग्यदायक आहे; म्हणून गणपतीला तुळस वहाणे निषिद्ध समजतात.
चतुर्थी इतिहास : गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.
श्री गणेशजयंती :माघ शुद्ध चतुर्थी ही `श्री गणेश जयंती' म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते.
श्री गणेश चतुर्थी महत्त्व :विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला मदत होते. (या लहरींविषयी अधिक माहिती सनातनचा ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते' यात दिली आहे.) श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
कुटुंबात कोणी करावी ? :`श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे `सिद्धीविनायक व्रत' या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.'
नवीन मूर्तीचे प्रयोजन : पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे - श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात व ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज व तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्तीला शक्य नसते.
श्री गणेशाभोवती सजावट करतांना गणेशतत्त्व आकर्षित करणार्या आकृतीबंधाचा वापर करणे : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते. (क्रमश:) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्री गणपति'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : रत्नागिरी (०२३५२) २२२३४६, चिपळूण (०२३५५) २५३८०८
श्री गणेश चतुर्थी आदर्शरीत्या साजरी करून गणेशतत्त्वाचा लाभ मिळवूया ! गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. `आपल्या घरात गणपति येणार आहे', या कल्पनेने आपले मन भरून येते. काही कुटुंबांत तर गणेश चतुर्थीची तयारी एक महिना आधीच सुरू होते. संपूर्ण घराची साफसफाई करणे, घराला रंगरंगोटी करणे इत्यादी सेवा सुरू होतात. गणेशोत्सवाला ४-५ दिवस असतांना मोदक, करंज्या बनवणे सुरू होते. या उत्सवात नातेवाईक व मित्रमंडळी घरी येतात; पण नेमकं होतं काय, तर आपण उत्सवामध्ये मनोरंजनात कधी मग्न होतो, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे `गणपति आपल्या घरी आहे', हेच आपण विसरतो. या उत्सवात आपण करत असलेल्या कृतींतील त्रुटी वगळल्यास व दृष्टीकोन योग्य ठेवल्यास आपल्याला श्री गणेशाचा आध्यात्मिक फायदा पूर्णपणे मिळून श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या कष्टाचे खर्या अर्थाने सार्थक होईल. काल आपण धार्मिक विधी कशा करायच्या ते पाहिले. आज आपण आरती करतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते पाहूया.
आरती करतांना खालील गोष्टी टाळाव्यात अ. आरती सुरू झाल्यानंतर अव्यवस्थितपणे उभे रहाणे. आ. कर्णकर्कश स्वरात व अनेक आरत्या म्हणणे इ. देवाशी काडीमात्र संबंध नसलेल्या गीतांच्या किंवा चित्रपट गीतांच्या चालीत असलेल्या आरत्या लावणे ई. आरती चालू असतांना एकमेकांकडे पाहून हसणे, खाणाखुणा व चेष्टा करणे इत्यादी (क्रमश:)